Ad will apear here
Next
‘जनसामान्यांना सोबत घेऊन नवा भारत घडविणारे संकल्पपत्र’
रावसाहेब पाटील दानवे यांची प्रतिक्रिया
मुंबई : ‘भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केलेले संकल्पपत्र हे शेतकरी, गावकरी, युवा, महिला, गरीब, अनुसूचित जाती- जमाती, व्यापारी, उद्योजक अशा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नवा भारत घडविणारे संकल्प पत्र आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवा भारत घडविण्याचे ध्येय साध्य करणारे आणि त्यामध्ये सर्व समाजघटकांना सोबत घेणारे हे संकल्पपत्र आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि संकल्पपत्र समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे मी अभिनंदन करतो.’
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे
‘छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन, किसान सन्मान निधी योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ, किसान क्रेडिट कार्डावर एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, देशातील सर्व रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करणार, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अशी संकल्प पत्रातील आश्वासने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयोगी असून, ग्रामीण भारताचे चित्र बदलून टाकणारी आहेत. रेशन दुकानांच्या व्यवस्थेत स्वस्त गहू- तांदूळ मिळणाऱ्या कुटुंबांना दरमहा तेरा रुपये प्रतिकिलो दराने साखर देण्याचे आश्वासन गरिबांना मदत करण्याबरोबरच राज्यातील साखर उद्योगाला वाचविणारे आहे. छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन, व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मंडळाची स्थापना, शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी मर्चंट क्रेडिट कार्ड, २०२२ पर्यंत प्रत्येकाला राहण्यास पक्के घर, वीज, नळाचे पाणी आणि गॅस कनेक्शन ही आश्वासने समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारी आहेत,’ असेही दानवे यांनी नमूद केले. 

ते म्हणाले, ‘पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात १०० लाख कोटींची गुंतवणूक, राष्ट्रीय महामार्ग दुप्पट करणे, रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज करून विद्युतीकरण, लघु व मध्यम उद्योगांच्या क्षेत्राला प्राधान्याने एक लाख कोटींचा कर्जपुरवठा, सर्व शहरांना पाईपने गॅस पुरवठा, ५० मोठ्या शहरात मेट्रो, शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर भर या आश्वासनांच्या पूर्ततेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्यास भाजपा वचनबद्ध आहे व त्याचा उच्चार जाहीरनाम्यात केला आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUPBZ
Similar Posts
‘कलम ३७० रद्द केल्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान सार्थ’ मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल सोमवारी (पाच ऑगस्ट) मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते
‘आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल’ मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदणीकृत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी
नवीन पिढीला पक्षाशी जोडण्यासाठी भाजपची ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहीम मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांना पक्षासोबत जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सोशल मीडियातील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा आधार घेतला जात आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language